पोस्ट्स

इमेज
पक्वान्न माझ्या लग्नानंतर माझ्या जपानी सासू सासऱ्यांना भारतीय संस्कृती , सणवार आणि खाद्यपदार्थ याबद्दल खूप उत्सुकता होती.त्यांना काहीतरी पारंपरिक मराठी पदार्थाची ओळख करून द्यावी म्हणून मी माझा अतिशय आवडीचा पदार्थ उकडीचे मोदक करायचे ठरवले.जपानमध्ये ओला नारळ अजिबात वापरला जात नाही आणि १६ वर्षांपूर्वी सुकं खोबरंसुद्धा मिळत नसे.त्यामुळे मोदकाच्या सारणात काय घालावं हा मोठा प्रश्न होता.माझ्याकडे भारतातून येताना आणलेला गुलकंद होता.त्याचाच सारण म्हणून वापर करायचं ठरवलं! उकडीचे मोदक साहित्य : (पारीसाठी) तांदुळाची पिठी १ कप                              पाणी १ कप                              मीठ चिमूटभर , थोडंसं तेल         ( सारण) गुलकंद आणि काजू कृती: सर्वप्रथम १ कप प...